
नळपाणी योजना जलवाहिनी कामात रस्त्यांची दुरावस्था
राजापूर तालुक्यातील पांगरे चिंचवाडी धरणामधून परिसरातील १३ गावांना प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्यात येत असून या योजनेची जलवाहिनी रस्त्याच्या बाजूने टाकण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. तर काही ठिकाणी रस्त्याची गटारेही बुजविण्यात येत आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पांगरे चिंचवाडी धरणामधून परिसरातील १३ गावांना नळपाणी योजना राबविण्यात येत असून ती पूर्णतः चुकीची राबविली जात असून ही योजना राबविताना शासनाच्या पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत असताना नळपाणी योजनेचे पाईप टाकताना रस्त्याची दुरवस्था केली जात आहे. www.konkantoday.com