
चिपळुणात वनविभागाने दिले मगरीला जीवदान
चिपळूण शहरातील पेठमाप येथे बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाच्या ठिकाणी रविवारी मगर आली. याची माहिती वनविभागाला मिळताच तेथे जावून या मगरीला ताब्यात घेत जीवदान देण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहर पेठमाप येथे वाशिष्ठी नदीवर बांधल्या जाणार्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी काम सुरू असताना तेथे नदीपात्रातील मगर आल्याने कामगार घाबरले. त्यामुळे ठेकेदार सुरज चिपळूणकर यांनी याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे वन्यप्राणी बचावपथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मगरीला वनविभागाने नव्याने विकसित केलेल्या लोखंडी पिंजर्यात पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी ताब्यात घेतले. व ती सुरक्षित असल्याची खात्री करून तिला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले. www.konkantoday.com