अंगणवाड्यांच्या चाव्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश
अंगणवाडी कर्मचार्यांनी गेल्या ४ डिसेंबरपासून पुकारलेल्या बेमुदत संपाची अजूनही शासनस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अंगणवाड्यांना लागलेले कुलूप अजून उघडलेले नाही. त्यामुळे बालके पोषण आहारापासून वंचित राहिल्याची दखल एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाड्यांचा पंचनामा करून पर्यवेक्षकांनी तात्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिले आहेत.
या संपामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाड्यातील सुमारे ३० हजारहून अधिक बालके पोषण आहारापासून वंचित राहिली आहेत. राज्यभरात अंगणवाडी कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवठ्याची, अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकार्यांना दिल्या आहेत. www.konkantoday.com