प्रणय चोरगे याने ६० किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक तर, प्रितम कांजर याने ६५ किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली


मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये तालुक्यातील विखारेगोठणे येथील रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी लक्षवेधी कामगिरी केली. त्यामध्ये प्रणय चोरगे याने ६० किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक तर, प्रितम कांजर याने ६५ किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली. त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या चाचणीसाठी निवड झाली आहे.
मुंबई विद्यापीठांतर्गंत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये मराठे महाविद्यालयाचे प्रणय चोरगे आणि प्रितम कांजर हे दोन विद्यार्थी वेगवेगळ्या वजनी गटातून सहभागी झाले होते. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे आदीनी अभिनंदन केले. मार्गदर्शन करणारे प्रा. विजय देवकर, प्रा. सुस्मित सुर्वे, प्रा.सुधीर न्हावेलकर, प्रा. गौरव पवार, प्रा. मयुरी पाटील यांचे देखील अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button