एलईडी मासेमारी करणार्या बोटींवर कारवाईला टाळाटाळ
राज्याच्या १२ नॉटिकल मैल समुद्र क्षेत्राच्या आत मासेमारी करणार्या नौकांसह एलईडी प्रकाशात मासेमारी करणार्या नौकांवरील कारवाईत सूट मिळू नये, यासाठी शाश्वत मच्छिमार हक्क संघ कार्यरत झाला आहे. नुकतेच ४ नौकांना एलईडी मासेमारी करताना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असा आरोप मच्छिमार हक्क संघाचे तालुकाध्यक्ष रणजित भाटकर यांनी केला आहे.
एलईडी प्रकाशात मासेमारी करण्यास बंदी आहे. त्याचबरोबर १ जानेवारीपासून राज्याच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात पर्ससीन नेट नौकांना मासेमारी करण्यास बंदी सुरू झाली आहे. मिरकरवाडा, राजीवड्यातील ४ पर्ससीन नौकांना एलईडी मासेमारी करताना पकडण्यात आले होते. यातील एक नौका खाकी वर्दीवाल्याच्या मालकीची होती परंतु या नौकांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाल्याचे शाश्वत मच्छिमार हक्क संघाचे तालुकाध्यक्ष रणजित भाटकर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मासेमारी नियंत्रणात रहावी यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून प्रत्येक कारवाईची माहिती लेखी मिळावी यासाठी अर्ज केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com