
रत्नागिरी शहरानजिक मिरजोळे भागात शेतजमीन खचली
रत्नागिरी शहरानजिक असलेल्या मिरजोळे मधलीवाडी परिसरात खालचा पाट येथे पुन्हा एकदा पावसाने भुस्खलन झाले आहे. मिरजोळे परिसरात दरवर्षी सातत्याने असे प्रकार घडत आहेत. ज्यामध्ये जमिनीला भेगा पडून मोठ्या प्रमाणावर माती वाहत जावून शेतीच्या भागातच चरे पडत असल्याने या भागातील शेती संकटात आली आहे. याबाबत सरकारकडून उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com