सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीच्या दिवसाच्या ३०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्या
मुंबई तसेच राज्याच्या इतर भागांत महिला सन्मान मेळावे होत आहेत.
त्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील १०० एस.टी. पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दिवसाच्या ३०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना गावी जाण्यासाठी तीन ते चार तास ताटकळत राहावे लागत आहे.
महिला महामेळाव्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील ७९ उरणला, तर खालापूर येथे २१ बसगाड्या पाठविण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यातील ३४, सावंतवाडीतील ३६, मालवण ५८, देवगड ८६, विजयदुर्ग ३७, कुडाळ ४२ आणि वेंगुर्ला आगारातील ७३ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. फेऱ्या रद्द झाल्याची माहिती प्रत्येक स्थानकात नोटिस फलकावर लावलेली आहे.
www.konkantoday.com