सागर महोत्सवद्वारे समुद्रातील जग, खनिजसंपत्तीवर प्रकाश
जगातले काही देश फक्त समुद्रावरच अवलंबून आहेत. त्यांची अर्थव्यवस्था त्यावरच चालते. भारताला लाभलेल्या सागरी ताकदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. समुद्रातील खनिजसंपत्ती, तेल, कोरल्स संशोधनासाठी मोठी संधी आहे. तसेच समुद्रात प्लास्टिक व अन्य प्रदूषण होवू नये म्हणून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांनी केले.
नेव्ही, कोस्टगार्ड, सागरी पोलीस संरक्षण करत आहेत. पूर्वीपासून भारतीयांना समुद्री व्यापाराची उत्तम माहिती, ज्ञान होते. परंतु इंग्रजांच्या काळात हे ज्ञान आपण विसरलो. आता ते पुन्हा आठवूया व प्रत्येकाने योगदान देवूया. या सार्यातून भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन होणार आहे, असे प्रतिपादन भारतीय नौसेनेचे कमोडोर श्रीरंग जोगळेकर (निवृत्त) यांनी केले. आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित द्वितीय सागर महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सागर महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक, एनआयओ संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आसमंतचे संस्थापक, संचालक नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते. महोत्सवासाठी महाविद्यालयासह राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी, इंडिया कोस्टल कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया, कोस्टल कॉन्झर्वेशन फाऊंडेशन यांचे सहकार्य आहे. www.konkantoday.com