
.श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने कुणकेश्वर येथे धार्मिक पर्यटन सहल उत्साहात संपन्न
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी आयोजित श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील धार्मिक पर्यटन सहल ज्येष्ठांच्या सहभागामुळे उत्साही वातावरणात संपन्न झाली. या सहलीत 66 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. श्रीराम मंदिर संस्थेचे मार्गदर्शक श्री. उल्हासराव घोसाळकर यांच्या प्रोत्साहनातून संस्थेचे मुख्य विश्वस्त श्री. संतोष रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीने सहलीचे नेटके आयोजन केल्याबद्दल ज्येष्ठानी संस्थेला मनःपूर्वक धन्यवाद दिले
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे मुख्य संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्या नेतृत्वाखाली सचिव श्री सुरेंद्र घुडे, खजिनदार श्री. रमाकांत पांचाळ सर, निवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी, प्रकाश सोमण, सूर्यकुमार शेटे, महिला प्रतिनिधी श्रीमती अपर्णा कोचरेकर यांनी या सहलीच्या आयोजनात प्रमुख भूमिका बजावली.
या सहलीचे संयोजन करताना पोखरबाव येथील प्राचीन गणपती मंदिर तांबळडेग येथील श्री. विठ्ठल रुक्माई मंदिर, श्री गजबादेवी आणि श्री रामेश्वर मंदिर येथील देवदर्शनानंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानाच्या दर्शनाने ज्येष्ठ नागरिक धार्मिक पर्यटनात भक्तिमय वातावरणात दंग झाले. तांबळडेग येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भजनाचाही त्यांनी आनंद घेतला त्यानंतर मिठबाव आणि कुणकेश्वर येथे मनसोक्त समुद्र सफर ही त्यांनी केली. तांबळडेग देवस्थानचे अध्यक्ष श्री. महादेव कोचरेकर आणि ट्रस्टचे श्री.नंदकुमार धुरी यांनी श्रीराम मंदिर कट्ट्याच्या प्रमुखांचा यावेळी श्रीफळ देऊन सन्मान केला. सहलीच्या समारोपसंगी आकाशवाणी कलावंत श्रीमती अनुया बाम आणि श्री.नंदकुमार बिर्जे यांनी सहलीच्या उत्तम नियोजनाबद्दल सहभागी जेष्ठांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करून सर्वाँना धन्यवाद दिले.
www.konkantoday.com