रेल्वेतील गुन्ह्यात आता तासात एफआयआर
रेल्वेमध्ये घडलेल्या कुठल्याही गुन्ह्यात तक्रारदार लोहमार्ग पोलीस ठाण्यात आल्यानंतर आता एक तासामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. बेपत्ता प्रकरणात तासाभरात कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात लोहमार्ग पोलिसांच्या प्रतिसादाबाबत तक्रारदार, प्रवासी समाधानी आहेत की नाहीत, याची आता थेट लोहमार्ग पोलीस महासंचालक दखल घेणार आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानक, लोहमार्ग पोलीस ठाण्यावर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पुणे लोहमार्ग अंतर्गत येणारी सहा पोलीस ठाणी व १४ आऊटपोस्टच्या ठिकाणी या उपक्रमाची अंमलबजावणी झाली आहे. www.konkantoday.com