खाण व्यवसायात मुलाला भागिदार करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक
खाण व्यवसायात मुलाला भागिदार करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने रत्नागिरी शहर पोलिसांत तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पद्मश्री प्रकाश कासार असे तक्रार दाखल करणार्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
संदीप अशोक मोहिते, नंदकुमार शिंदे (रा. दोन्ही मुंबई) व संतोष चव्हाण (रा. खेडशी-रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी संशयित आरोपी हे तक्रारदार महिलेच्या घरी आले होते. आम्ही खाण व्यवसाय करणार असून तुमच्या मुलाला या व्यवसायात भागिदार करून तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देवू, असे आमिष दाखवले.
व्यवसाय सुरू करण्यासाठी तक्रारदारांनी संदीप अशोक मोहिते व नंदकुमार शिंदे यांच्या खात्यावर प्रत्येकी १० लाख ५० हजार व ५५ हजार रुपये खात्यावर जमा केले.
www.konkantoday.com