कुमारी ईशा रहाटे हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर-
र.ए. सोसायटीची रा.भा. शिर्के प्रशालेतील कुमारी ईशा संदेश रहाटे हिला चतुरंग प्रतिष्ठान तर्फे २०२३-२०२४ चा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. कुमारी ईशा ही शिर्के प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शिकत असून ती उत्तम गायक आहे .तसेच भरतनाट्यम नृत्य प्रकारात तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण गटात जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एनसीसी च्या एटीसी कॅम्पमध्ये ती बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली आहे. शिर्के प्रशालेची शैक्षणिक वर्ष सन २०२३-२०२४ ची ती आदर्श विद्यार्थिनी आहे. अशी गुणवंत विद्यार्थिनी कुमारी ईशा संदेश रहाटे हिला चतुरंग प्रतिष्ठान तर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल र.ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण,
उपमुख्याध्यापक श्री. कुमारमंगल कांबळे ,पर्यवेक्षिका सौ.पुनम पवार , सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले.
www.konkantoday.com