२६ जानेवारीला सावकर नाट्यगृहाचे होणार लोकार्पण
रत्नागिरीकरांना दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मला आनंद:- उदय सामंत
*रत्नागिरी, दि. १३)- पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपरिषदेच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, थिबा पाॕईंट येथील जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टी येथे भेट देवून सुरु असणाऱ्या कामांची पाहणी केली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या जागेबाबत, सनसेट पाईंट, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग, संरक्षित भिंत, स्वच्छता आणि फूड कोर्टबाबत पालकमंत्र्यांनी विशेष सूचना केल्या. या कामांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. ही सर्व कामे गतिने सुरु ठेवा, असेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.२६ जानेवारीला सावकर नाट्यगृहाचे होणार लोकार्पण होणार असून रत्नागिरीकरांना दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मला आनंद होत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर,युवा तालुका प्रमुख तुषार साळवी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com