वैद्यकीय महाविद्यालयात १७ पैकी ३ सहयोगी प्राध्यापक रूजू
रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता पहिल्या वर्षासाठी प्राध्यापकांची पदे भरण्यास प्रारंभ झाला आहे. नुकतेच महाविद्यालयात ३ सहयोगी प्राध्यापक रूजू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या शैक्षणिक वर्षाबाबत सुटकेचा निश्वास सोडला आहे. पहिल्या वर्षीच्या परीक्षाही नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याने आता अभ्यासक्रम पूर्ण होण्यासही कोणतीही अडचण येणार नसल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले.
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आता १०० प्रवेश मंजूर करण्यात आले आहेत. महाविद्यालयासाठी सध्या वरिष्ठ प्राध्यापकांची ६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त २ प्राध्यापक रूजू झाले आहेत. तसेच वरिष्ठ निवासी प्राध्यापकांसाठी मंजूर ३८ पदांपैकी ६ पदे भरली गेली आहेत. मात्र सहयोगी प्राध्यापक पदासाठी मंजूर १७ व सहाय्यक प्राध्यापक म्हणून मंजूर २४ पदांपैकी अद्याप कोणतेच पद भरले गेले नसल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या यावर्षीच्या अभ्यासक्रमाविषयी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बसू लागला होता. वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू होवून आता ४ महिने लोटले तरी अद्याप एकही प्राध्यापक नाही, रितसर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असा प्राध्यापक वर्ग नाही व अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालयासाठी आस्थापनेचे कर्मचारी नाहीत, अशी विदारक अवस्था समोर येवू वहावु होती. मात्र या महाविद्यालयासाठी ३ सहयोगी प्राध्यापक रूजू झाले आहेत. यात पहिल्या वर्षासाठी सुक्ष्म जीवशास्त्र विषयासाठी डॉ. मोनीता कुलकर्णी, जीवरसायन शास्त्रासाठी डॉ. किरण पुजारी व औषध शास्त्रासाठी डॉ. शमा भोसले यांचा समावेश आहे. www.konkantoday.com