वेरॉन कंपनीच्या लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी
रत्नागिरी लगतच्या एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीचे लाखोंचे साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ६ ते ८ जानेवारी २०२४ दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी गणेश दयानंद तरेराव (रा. सोलापूर) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीच्या प्लॉट नं. डी-७१ येथे लोखंडी साहित्य ठेवण्यात आले होते. ६ ते ८ जानेवारीदरम्यानच्या काळात चोरट्यांनी या ठिकाणी प्रवेश करून १ लाख २५ हजाराचे साहित्य चोरून नेले, अशी तक्रार तरेराव यांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
www.konkantoday.com