इव्हीएम हटाव… देश बचाव, बॅलेट पेपर लाओ… देश बचाओ अशा घोषणा देत भारत मुक्तीचा मोर्चा
इव्हीएम हटाव… देश बचाव, बॅलेट पेपर लाओ… देश बचाओ अशा घोषणा देत भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन छेडण्यात आले. निवडणूकीत इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वापरा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.देशात सध्या निवडणूका इव्हीएमवर होत आहेत. निकालानंतर अनेकजणांकडून इव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत अविश्वास दाखवला जात आहे. यापुर्वीही इव्हीएमच्या निकालावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर व्हीव्हीपॅक मशीन लावण्यात आले. तरी अद्यापही इव्हीएमवर अविश्वास दाखवत भारत मुक्ती मोर्चाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले. इव्हीएम हटाव… देश बचाव, बॅलेट पेपर लाओ… देश बचाओ अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यानी दिल्या. देशामध्ये पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. याप्रसंगी पंकज सावंत, बाळा कचरे, बी.के.पालकर, संजय कदम, संजय आयरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
www.konkantoday.com