
६ इंचापासून ते २१ इंचापर्यंत विविध आकाराच्या ५०० शाडू मातीच्या मूर्ती २०फूट कंटेनरमधून कॅनडाला रवाना
पेणचे बाप्पा कॅनडाच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुण्यातील ‘माईलस्टोन’ या टीमने यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या टीममधील अनेक सदस्यांना, त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊनदेखील त्यांनी वेळेत या मूर्ती कॅनडाला पाठवल्या आहेत.पेण म्हणजे बाप्पाचं गाव. इथल्या घराघरात वर्षभर बाप्पाची मूर्ती तयार केली जाते. आकर्षक रंगसंगती असलेल्या इथल्या मूर्तींना देश-विदेशात मोठी मागणी असते. पुण्यातील ‘माईलस्टोन’ ही टीम गेल्या पाच वर्षांपासून पेणमधील गणेशमूर्ती कॅनडात पोहोचवण्याचे काम करते. पहिल्या वर्षी त्यांनी ८५मूर्ती कॅनडाला पाठवल्या. यंदाच्या वर्षी त्यांनी ६ इंचापासून ते २१ इंचापर्यंत विविध आकाराच्या ५०० शाडू मातीच्या मूर्ती २०फूट कंटेनरमधून कॅनडाला पाठवल्या आहेत
www.konkantoday.com