मनसे माजी शहराध्यक्ष जैतापकर कॉंग्रेसमध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजापूर शहराचे माजी शहर अध्यक्ष आजिम जैतापकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेसच्या माजी आममदार हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखाली जैतापकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
कॉंग्रेसच्या राजापूर संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, सुलतान ठाकूर, आसिफ मुजावर, सौ. स्नेहा कुवेसकर, जितेंद्र खामकर, संतोष कुळ्ये, नवनाथ बिर्जे आदींसह कॉंग्रेस पदाधिकारी व कोंढेतड परिसरातील लतिफ कोंडकर, समीर जैतापकर, निसार खान, अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. www.konkantoday.com