
भरत गोगावले यांचाच व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल,-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
भरत गोगावले यांचाच व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला होता. राहुल नार्वेकर यांच्या निर्णायाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एबीपी माझाला Exclusive मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी विधिमंडळात भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरेंच्या आमदारांनाही लागू होईल, असं सांगितलं.
माझ्यासमोर असलेला निवडा सोडवताना विधिमंडळ पक्षातील गट आहेत, त्यातील मूळ राजकीय पक्ष आहे. त्यासंदर्भात मी निर्णय दिला आहे. त्यामुळे एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाही. मी ज्यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली. त्यांचा व्हीप सर्वांना लागू होईल, असे नार्वेकर यांनी सांगितलं. ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत, त्या गटातील प्रतोदाचा व्हीप त्यांना लागेल. म्हणजेच भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटालाही लागू होईल.
www.konkantoday.com