कोंडगांव हद्दीत उड्डाणपूल, भुयारी मार्गाला विरोध
मिर्या ते नागपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामांमध्ये कोंडगांव हद्दीत उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग न करता तो सन २०१७ च्या सर्व्हेप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी येथील महामार्ग बाधित जमीन मालक, व्यावसायिक यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या निवेदनात म्हटले ओ की, मिर्या ते नागपूर चौपदरीकरण काम सुरू आहे. तरी कोंडगाव येथे २०१७ च्या सर्वेनुसार व पुढील अनेक सर्वेनुसार ग्रामस्थ व त्यातील अनुभवी अधिकारी यांच्या विचाराने जंक्शन सुधारणा करण्याचे ठरले. २०२३ ला रूंदीकरणाचे काम ५० टक्के पूर्ण झाल्यावर येथील जंक्शनला इतर काही लोक विनाकारण विशेष रोध केला आहे. जे लोक विरोध करीत आहेत त्यांची कुठलीही जमीन या रस्ता रूंदीकरणात गेलेली नाही.
ज्या स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी स्वतःच्या चालू असलेल्या उद्योगधंद्यांच्या जमिनी दिल्या, त्यांचा एक टक्केही विचार न करता काही लोक विनाकारण चालू असलेल्या कामाला विरोध करीत आहेत.
www.konkantoday.com