एमटीडीसीकडून महिला पर्यटकांना ५० टक्के सवलत
महिलांच्या गौरवार्थ शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शिवाय अनेक ठिकाणी सवलती देखील दिल्या जात आहेत. याचा एक भाग म्हणून २०२२ विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये महिला दिनानिमित्त १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत ५० टक्के सवलत योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे महिलावर्गाला महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी आणि यातून आत्मविश्वास वाढविण्याच्या हेतूने ही योजना अर्थात सवलत जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र ही योजना १ मार्च ते ८ मार्च या कालावधीपूरती मर्यादित राहणार आहे.
www.konkantoday.com