
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी लावण्यात आलेली शेती व आई-वडीलांच्या नोकरीच्या उत्पन्नाची अट शासना कडून रद्द
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेतीसोबत आई-वडीलांच्या नोकरीचे उत्पन्न सुद्धा गृहीत धरण्यात येत होते. यामुळे अनेक विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी अपात्र ठरत असून त्यांचे नुकसान होत होते. ही बाब लक्षात आल्याने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी लावण्यात आलेली शेती व आई-वडीलांच्या नोकरीच्या उत्पन्नाची अट शासनाने रद्द केली. यामुळे इतर मागास वर्गासह भटके विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे
www.konkantoday.com