शिवसेनेची 2018 ची घटना अमान्य, उद्धव ठाकरेंना पहिला धक्का; राहुल नार्वेकरांचं निरीक्षण
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचं वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेची 1999 सालची घटना वैध असून 2018 साली ठाकरेंनी केलेली घटनादुरूस्ती मान्य नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले.1999 सालची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावर असलेली एकमेव घटना असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंंना हा पहिला धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल असं सांगत 2018 सालची शिवसेनेची घटना स्वीकारता करता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
”2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.”, असं विधानसभा अध्यक्षांनी निकालवाचनात स्पष्ट केलं आहे.
www.konkantoday.com