
बछड्यासाठी मादी बिबट्याने केला होतावृद्धावर हल्ला
रत्नागिरी खानू येथील वृद्धावर बिबट्याने केलेला जबर हल्ला आपल्या बछड्याला वाचविण्यासाठी मादी बिबट्याने केल्याचा कयास वन विभागाने लावला आहे. घटनेवेळी बछड्यासोबत असलेल्या बिबट्या मादीने आपले थेट पुढचे दोन्ही पायांचे पंजे त्या वृद्धाच्या खांद्यावर ठेवून तो हल्ला करत होता. आरडाओरड होताच जेव्हा बछडा मागे फिरला, त्यावेळी वृद्धाला जखमी करून सोडून देत लागोलाग बछड्याबरोबर बिबट्या पळून गेल्याचे या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीनी हकीकत कथन केली. शनिवारी खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे (७०, रा. खानू-पाली) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. www.konkantoday.com