गुहागर-विजापूर महामार्गाच्या कामाबाबत सुनिल तटकरे नाराज


गुहागर-विजापूर महामार्गाचे काम ठेकेदार योग्य पद्धतीने करत नाही. यामुळे माझी सुद्धा निराशा झाली आहे. संयमाचा अंत झाला आहे. या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचयाकडे तक्रार करणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
गुहागर विश्रामगृहावर शासकीय अधिकार्‍यांसमवेत विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांजवळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, आढावा बैठकीत जलजीवन मिशन, शहरातील पाणी योजना, गुहागर-विजापूर महामार्गाच्या कामातील अडचणी, माणगांव अपघातातील १० जणांच्या दुर्दैवी मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळवून देणे व अन्य प्रलंबित प्रश्‍नांबाबत चर्चा झाली. अधिकार्‍यांच्या अडचणी समजून घेतल्या. काही अडचणींबाबत थेट वरिष्ठांशी चर्चा केली आहे. पुढील १५ दिवसात यातील अनेक विषय मार्गी लागतील. महामार्गाच्या आठ गावातील भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून जमीन मालकांना मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रांताना सूचना देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button