
१० जानेवारी रात्री ११.५९.५९ सेकंदांपर्यंत राहुल नार्वेकर वेळ खेचतील आणि आणखी वेळकाढूपणा करतील-उद्धव ठाकरें
आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल, मे महिन्यात निकाल देताना रिझनेबल वेळेत निकाल लावला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली.त्यानंतर १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिली. माझी अशी अपेक्षा आहे की १० जानेवारी रात्री ११.५९.५९ सेकंदांपर्यंत राहुल नार्वेकर वेळ खेचतील आणि आणखी वेळकाढूपणा करतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आमदार अपात्रता प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे. लवाद ज्यावेळी नेमून दिला जातो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? असा प्रश्न उपस्थित होतो. यांची मिलिभगत आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
आता लवाद म्हणून विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष असे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत असं झालं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आरोपीला दोनदा अध्यक्ष का भेटले? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची? असा आमचा जनतेच्या न्यायालयात प्रश्न आहे. आज उल्हास बापट यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी म्हटलं आहे की दोन महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्यात दोन वर्षे काढली आहेत.
www.konkantoday.com