जिल्ह्यात पीएम किसानसाठी विशेष मोहीम
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत गाव पातळीवर मोहिम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यातील पीएम किसान योजनेचा प्रस्तावित सोळावा हप्ता वितरित करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
या योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १ लाख ६५ हजार ७२९ लाभार्थी सहभागी असून यामधील ई केवायसी प्रलंबित असलेले ६ हजार २७२, बँक खाते आधार संलग्न नसलेले १७ हजार ५१३ असे भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेले १० हजार १९५ लाभार्थी प्रलंबित आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्य करण्यासाठी दोन टप्प्यात कामकाज शासनामार्फत करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com