
चिपळुणात बनावट इन्शुरन्स पॉलिसीतून फसवणूक
वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करतेवेळी या वाहनाची इन्शुरन्स पॉलीसी ही बनावट माहितीद्वारे केल्याची तक्रार पुढे आला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केला असून या प्रकरणी दोघांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
संदेश सीताराम चाळके (लोटे) व मनोज कदम (चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद दहशदवादविरोधी शाखा, रत्नागिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाळू कदम यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील दहशतवादविरोधी शाखांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम हे जात असताना त्यांना वालोपे येथे एक ट्रक ओव्हरलोड साहित्य भरलेला तसेच संशयास्पद स्थितीत जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दत्तात्रय कदम यांनी या वाहनास चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी रेल्वे पुलाठिकाणी थांबवून या वाहनाच्या कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी या वाहनाच्या इन्शुरन्स कागदपत्रांची पडताळणी करतेवेळी ही इन्शुरन्स पॉलिसी बनावट असल्याची माहिती पुढे आली. त्यावर चालकाकडून या बाबत अधिक माहिती घेताना संदेश चाळके (लोटे) याने मनोज कदम (चिपळूण) यांच्याकडून ही पॉलिसी काढल्याचे सांगितले. यावरून संदेश चाळके व मनोज कदम या दोघांनी शासकीय दस्तऐवजामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चुकीची माहिती खरी असल्याचे सादर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली. या प्रकरणी दोघांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com