खेड येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरून नेले
खेड येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने भरणेशिवनेरीनगर येथील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे ६ ते ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी दोन चोरट्यांवर
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
भरणे–शिवनेरीनगर येथे दोन संशयित दारोदारी फिरत सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचे आमिष दाखवत होते. हे दोन्हीही चोरटे परिसरातील चार ते पाच घरांमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे
मात्र या ठिकाणच्या महिलांनी नकार देऊन त्यांना माघारी पाठवले होते. मात्र याच परिसरातील एकट्या राहणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या घरी दोन्ही चोरटे दाखल झाले. त्या चोरट्यांनी या वृध्द महिलेकडे पॉलिश करण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. दागिने मिळताच ते त्यानी आपल्याकडच्या साबणाच्या पाण्यात टाकले. काही क्षणानंतर ते बाहेर काढून पॉलीश करण्याचे नाटक करत तिथून पलायन केले
Www.konkantoday.com