
कीर्तनसंध्या महोत्सव तूर्त सध्या स्थगित ,नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार
रत्नागिरी : आज (नऊ जानेवारी २०२४) पहाटे अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे कीर्तनसंध्या महोत्सव एक दिवस उशिरा सुरू होणार असल्याचे आजच दुपारी जाहीर केले होते. मात्र पावसामुळे निर्माण झालेली स्थिती आणि हवामानाचा वर्तवण्यात आलेला अंदाज यांचा विचार करून कीर्तनसंध्या महोत्सव तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महोत्सवाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. कीर्तनसंध्या महोत्सवाला दर वर्षीच रसिक श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यामुळे हा कार्यक्रम खुल्या मैदानात आयोजित केला जातो; मात्र सध्याच्या पावसाळी स्थितीच्या अनिश्चिततेत एवढा भव्य कार्यक्रम खुल्या मैदानात घेणे शक्य नाही. महोत्सवाचे स्वरूप भव्य असल्याने प्रत्यक्ष मैदानावरच्या तयारीलाच किमान दोन-तीन दिवस लागतात. या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच महोत्सव तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
ठरवल्याप्रमाणेच भव्य-दिव्य स्वरूपातच महोत्सव होणार आहे. मात्र नव्या तारखा लवकरच जाहीर करू, असे कीर्तन संध्या परिवारातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
www.konkantoday.com