शिंदे सरकार जाणार की राहणार? परवा दुपारी 4 वाजता निकाल?
आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. या निकालाकडे राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली आहे.निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे. निकालाचे ठळक मुद्दे विधानभवानामध्ये वाचले जाणार आहेत. या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. राहुल नार्वेकर यांनी मागे अनौपचारिक गप्पांदरम्यान याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.
शिवसेना आमदार अपात्रतच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार. आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल,असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं.
www.konkantoday.com