विनापरवाना गावठी बंदूक बाळगणाऱ्या तरुणाविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील निरूळ येथे विनापरवाना गावठी बंदूक बाळगणाऱ्या तरुणाविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 5 जानेवारी रोजी करण्यात आली.
अनेश अनंत कांबळे (29, रा.चांदोर बौद्धवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित अनेश कांबळे हा निरूळ ते चांदोर जाणाऱ्या जंगलमय रस्त्यावर उभा होता. त्यावेळी त्याच्या हातात 20 हजार रुपये किंमतीची 12 बोअर गावठी सिंगल बॅरल बंदूक होती.पूर्णगड पोलिसांनी अनेशची चौकशी केल्यावर त्याच्याकडे त्या बंदुकीचा परवाना नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
www.konkantoday.com