राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष पदी सुरेश तथा बारक्याशेट बने
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष पदी सुरेश तथा बारक्याशेट बने यांची नियुक्तीची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस व जिल्हा निरिक्षक बबन कनावजे यांनी देवरूख येथिल पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले असल्याचे सांगत ते नियुक्तीपत्र सुरेश बने यांना दिले.
अजीत पवार यांनी बंड केलेवर राष्ट्रवादी काँग्रेस मधे मोठी फुट पडलेवर जिल्हात शरद पवार गटाने पुन्हा संघटना मजबूत करणेच्या अनुशंगाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा निरीक्षक माजी नगरसेवक बबन कनावजे यांनी तातडीने रत्नागिरी जिल्हात दौरे करून संघटना वाढीसाठी अनेक पदांच्या निवडी करून सुदेश मयेकर यांनी जिल्हात संघटना वाढीसाठी प्रयत्न केले.
त्याचवेळी काही असंतुष्टांनी मयेकर यांना विरोध करत अपशकून केला. त्याला कंटाळून जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी तब्बेतीचे कारण देत जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला होता
www.konkantoday.com