रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परबच
रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी अद्यापही जिल्ह्याचे पालकमंत्री हे आमदार अनिल परब आहेत तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे आहेत असाच काहीसा प्रकार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाबाबत घडला आहे.
जिल्हा परिषदेच्या ०० या अधिकृत संकेतस्थळावर मुखपृष्ठाच्या बाजूला असलेल्या जिल्ह्याविषयी या घटकात जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींवर क्लिक केल्यास येणार्या स्क्रिनवर अद्यापही असलेली माहिती अद्ययावत झालेली नसल्याचे दिसते. यात प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत नसून आमदार अनिल परब हे असल्याचे दिसते तर आता उद्योगमंत्री असणारे उदय सामंत या संकेतस्थळावर मात्र उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे दिसते आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून जुन्याच माहितीची री ओढली जात आहे. www.konkantoday.com