एका दिवशी दोन मोठ्या दुर्घटनामुळे लोटे एमआयडीसी हादरली.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसीमध्ये आज दोन भीषण घटना घडल्या आहेत.दुपारी एक वाजता लासा कंपनीमध्ये भीषण आग लागल्यानंतर दोन तासानंतरच एकविला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रिऍक्टरचा स्फोट झाला आहे.यामध्ये दोन कामगार होरपळल्याची माहिती समोर आली आहे.एका दिवशी दोन मोठ्या दुर्घटनामुळे लोटे एमआयडीसी हादरली असून प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दुपारी एक वाजता लासा कंपनीमध्ये भीषण आग लागल्यानंतर दोन तासानंतरच एकविला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रिऍक्टरचा स्फोट झाला.यामध्ये दोन कामगार होरपळल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.मात्र या ठिकाणी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमी कामगारांना दुचाकीवर नेण्यात आले.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास ते करत आहेत .एकाच दिवशी घडलेल्या या आगीच्या घटनेचे कारण अस्पष्ट आहे. मात्र परिसरात धुराचे लोळ पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. केमिकल कंपन्यांमध्ये लागणाऱ्या सततच्या आगीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button