
दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला ‘या’ विद्यार्थ्यांनाच पैकीच्या पैकी गुण! बोर्डातर्फे भरारी पथकांचा राहणार वॉच
प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानवरही भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील व चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक देतील त्यांनाच पैकीच्या पैकी गुण मिळतील.गैरहजर किंवा प्रात्यक्षिक अपूर्ण असलेल्यांना मनमानी पद्धतीने गुण देता येणार नाहीत हे निश्चित.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत तर इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
www.konkantoday.com