वाशिष्ठी प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणी माणसाला येथील तरुणाला आणि शेतकऱ्याला एक नवा पर्याय उपलब्ध-.दिलीप वळसे पाटील
कोकणी माणूस जिद्दी आहे, कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, त्याला खंबीरपणे साथ देण्याची व सहकार्याची गरज आहे. प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणी माणसाला येथील तरुणाला आणि विशेष म्हणजे येथील शेतकऱ्याला एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे वाशिष्ठी दूध प्रकल्पामुळे येथील शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. वाशिष्ठी प्रकल्पाने आयोजित केलेल्या कृषी व पशुधन महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. महानंदा प्रकल्प गुजरात ला जाणार नाही, तो महाराष्ट्रातच राहील असेही ठामपणे ते म्हणाले.
चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन प्रशांत यादव व सौ.स्वप्ना यादव यांनी चिपळूण बहादूरशेख येथील सावरकर मैदानावर कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी त्याचे उदघाटन ना.दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार विनय नातू, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, चिपळूण नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डी. एस. जगदाळे तसेच कृषी जिल्हा अधीक्षक डॉ. सुनंदा कुराडे, सहाय्यक निबंधक दुग्ध संस्था श्री. यशवंतराव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, माजी सभापती पूजा निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पूर्वा वळसेपाटील, उबाठा गटाचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी सभापती पूजा निकम, ऍड. नयना पवार, यांच्यासह अनेक मान्यवर व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
www.konkantoday.co.