राजेश मयेकर यांना पत्रकार सन्मान, सचिन सावंत यांना पत्रकार भुषण पुरस्कार प्रदान, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची बीजे रुजायला हवीत – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी


रत्नागिरी, दि.०६, प्रतिनिधी : बीए, बीएस्सी आणि बी कॉम झाल्यानंतर तुम्ही जर स्पर्धा परीक्षांकडे वळणार असाल तर तेव्हा उशीर झालेला असेल. तुम्हाला तयारीला तेवढा वेळ मिळणार नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे बीज तुमच्यामध्ये या वयातच रोवले गेले पाहीजे. आतापासूनच तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे लक्ष दिले तर तुमच्यामधून प्रशासकीय अधिकारी घडतील, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते आज पत्रकार दिनानिमित्त द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन दक्षिण जिल्हा आयोजित स्पर्धा परीक्षेचे महत्व या विषयावरील व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. आज ज्येष्ठ पत्रकार राजेश मयेकर यांना पत्रकार सन्मान आणि सचिन सावंत यांना पत्रकार भुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरमध्ये द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन दक्षिण जिल्ह्याच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या पत्रकार दिनानिमित्त संघटनेच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे महत्व या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प आज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गुंफले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचे महत्व या विषयावर आज तुम्हाला मी मार्गदर्शन करताना काही मोजक्या गोष्टी सांगणार आहे. स्पर्धा परीक्षा हा मोठा विषय आहे, पण आज मोजक्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्यामुळे तुम्हाला आज स्पर्धा परीक्षांबाबत जिज्ञासा निर्माण होईल. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्याला माहीती असणे आवश्यक आहे. जसे आपण मराठी, इंग्रजी, भुगोल, इतिहास या विषयांचा अभ्यास करतो त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहीजे. आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो त्या विषयावर आधारीत स्पर्धा परीक्षा असतात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वर्तमानपत्र वाचणेही खूप महत्वाचे आहे. वर्तमानपत्रातून तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास होतो. त्यामुळे नियमित वर्तमानपत्र वाचा असा सल्लाही जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधून आपण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरिक्षकसह अन्य काही अधिकारी पदावर आपण नियुक्त होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांचे युपीएससी आणि एमपीएससी असे दोन प्रकार आहेत. बीए, बीएस्सी, बीकॉम नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे वळणार असाल तर तम्हाला तयारीला तेवढा वेळ मिळणार नाही. स्पर्धा परीक्षांचे बीज तुमच्यामध्ये आताच रोवले गेले पाहीजे. आतापासूनच तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची मानसिक तयारी केली पाहीजे असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, द पॉवर ऑफ मिडीयाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दुर्गेश आखाडे, कोकण संपर्क प्रमुख अजय बाष्टे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, तालुकाध्यक्ष सिध्देश मराठे, तालुका उपाध्यक्ष सचिन सावंत, राजन चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना दुर्गेश आखाडे यांनी केली तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार राजेश मयेकर यांना पत्रकार सन्मान पुरस्कार आणि सचिन सावंत यांना पत्रकार भूषण पुरस्कार देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप होते. चौकट : चांगले माणूस व्हा
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, मी शाळेत असताना आम्हालाही असे कार्यक्रमासाठी बसवले जायचे. आज पुन्हा शाळेत आल्यासारखे वाटतेय. पण त्या शाळेने केलेल्या संस्कारामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. भविष्यात तुम्ही प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, शिक्षक व्हालच. पण त्याआधी एक चांगले माणूस व्हा. कारण आजच्या जगात चांगली माणसे घडण्याची गरज आहे असे सांगताना त्यांनी काही बोधकथा सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button