ठेकेदाराने वीजकर थकवल्याने शृंगारतळी महिनाभर अंधारात


मोठा गाजावाजा करून गुहागर विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या ठेकेदाराने शृंगारतळी पथदीप बसवले होते. मात्र ठेकेदाराने वीजकर थकवल्याने वीज पुरवठा खंडीत केल्याने  शृंगारतळी अंधारात आहे. या विरोधात पाटपन्हाळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित ठेकेदाराला पत्र देवून जाब विचारला.
गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणात शृंगारतळीतील बरीचशी कामे अर्धवट आहेत. बाजारपेठेतील बस थांबाही अजून उभारण्यात आलेला नाही. मनिषा कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराने सुमारे ४ महिन्यापूर्वी शृंगारतळीत पथदीप बसवून परिसर प्रकाशमान केला. मात्र  गेल्या ४ महिन्यात  पथदीप कर भरणा नसल्याने त्रस्त झालेल्या महावितरणच्या वसुली अधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत  विचारणा करून पथदीप कर भरण्यास सांगितले होते. मात्र आजतागायत ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button