चिपळुणातील सावकारी कारवाईचे गुहागरवर सावट
सावकारीच्या विरोधात चिपळूण तालुक्यात मोठी कारवाई सुरू असल्याने व याविरोधात जोरदार उठाव झाल्याने येथील कारवाईचे सावट गुहागर तालुक्यातील सावकारीवर पडू लागले आहे. तालुक्यातील अनेक सावकारांचे धाबे दणाणले असून सर्वाधिक कामगार असलेल्या दाभोळ परिसरात सावकारी अधिक असल्याची चर्चा आहे
जिल्ह्यात सावकारी धंद्याने कहर केला आहे. चिपळुणमध्येही सावकारीचा विळखा मोठा आहे. चिपळूणमध्ये महिना १० ते १५ टक्के व्याजाने पैसे देवून वसुली केली जात आहे. असा आरोप करण्यात येत आहे. अडलेला माणूस अडचण दूर करण्यासाठी पैसे घेतो आणि अधिक अडचणीत सापडतो. कर्ज वसुलीसाठी घरात जावून धमकी देणे, कोर्या बॉण्ड पेपरवर धनादेशावर सह्या घेणे, कर्जदाराला ब्लॅकमेल करणे अशा अनेक घटना घडत आहेत. www.konkantoday.com