
कोकण मार्गावरून धावणार्याउधना-मंगळूरला एक अतिरिक्त डबा
कोकण मार्गावरून धावणार्या उधना-मंगळूर एक्स्प्रेसला ८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असतानाच एक स्लीपर श्रेणीचा अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी जाहीर केले.
त्यानुसार ०९०५७/०९०५८ क्रमांकाची उधना-मंगळूर एक्स्प्रेस जानेवारी तर परतीच्या प्रवासात ६ जानेवारी एक अतिरिक्त स्लीपर श्रेणीच्या डब्यांची धावणार आहे.
यामुळे कोकण मार्गावरून धावणार्या गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. www.konkantoday.com