सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळा व गो विज्ञान केंद्राच्या वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न.


कार्यक्रमासाठी पुनरुत्थान ट्रस्ट संचलित, वासुदेव बळवंत फडके गोशाळा, पिंपरी चिंचवड पुण्याचे अर्जुन श्रीमाली, महेंद्र महाराज तेजाराम, हेमराजजी ,मांगीलालजी यांची उपस्थिती


रत्नागिरी:- सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळा व गो विज्ञान केंद्राच्या वास्तूच्या भूमिपूजन कार्यक्रमाची उत्तम अशा प्रकारची योजना सर्वांच्या मदतीने पार पडली. श्री दाते काका, इनामदार सर, अनुजाताई पेठकर,विनोद पेठकर ,छायाताई अणावकर , राकेश वाघ , संतोष पावरी, अशोक पाटील सर ,अमोल चाटे ,देवेंद्र झापडेकर , राकेश नलावडे,दीपकजी देवल व सर्व मरुधर समाजातील कार्यकर्ते व पाटीदार समाज बांधव, पतंजली चे कार्यकर्ते, रोटरी क्लब चे कार्यकर्ते , सोमेश्वर मंदिर ट्रस्टी व ग्रामस्थ व रत्नागिरीतील समस्त गोभक्त यांच्या उपस्थितीत विश्व मंगल गोशाळा व गो विज्ञान केंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सोमेश्वर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हणून केली अतिशय मंगलमय वातावरणात भूमिपूजन अनेक कुटुंबांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील अनेक निमंत्रित मान्यवर उपस्थित होते यामध्ये प्रकाश गुडे, विकास मयेकर जितेंद्र भोगले, मुन्ना पिलणकर, अमर पिलणकर हे भैरी मंदिराचे ट्रस्टी उपस्थित होते. याशिवाय प्रभाकर खानविलकर, शरद कोतवडेकर दत्तात्रय शेलार,बाबाशेठ नाचणकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीकांत भुरके,धरम सिंह भाई चव्हाण, सचिन शिंदे, विनायक हातखंबकर, प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित होते.भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके याशिवाय मंदार खंडकर, दादा ढिकणे,ज्ञानेश पोतकर,भडकमकर,संतोष बोरकर,अमीर कीर, अनिरुद्ध फळणीकर, ऋषिकेश केळकर,निलेश आखाडे,सचिन गांधी, अनिस पटवर्धन, राजन महाकाळ हे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला सोमेश्वर च्या सरपंच नाझिया मुकादम व उपसरपंच उत्तम नागवेकर,. तलाठी भाऊ पांचाळ
कुवारबावच्या सरपंच मंजिरी पाडळकर हे उपस्थित होते.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राकेश जी नलावडे, ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आप्पा बापट,अप्पा साठे, कौस्तुभ जी सावंत ,पुराणिक सर असे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गोमातेचे महत्त्व श्री वैभवजी चव्हाण व श्रीकांत ढालकर यांनी सांगितले. आकाश शास्त्री यांनी मार्गदर्शन केले तनयाताई शिवलकर .अमृता मिरकर उदयकुमार मिरकर ,प्रमिला पूसाळकर सुनीता भावे तीर्था कीर ,रश्मी खोत,नेहा बोरकर ,प्रभाकर खानविलकर, प्रतिभा मयेकर ,प्रणया हरचिरकर, रेश्मा पवार, सुकांता जाधव, निशिगंधा घाटविलकर धरमसिंग चव्हाण ,भरत इदाते ,संजय अहिरे, मिलिंद करंजवकर ,तुषार देसाई ,दीपक मयेकर ,सुनील मुळे,शिरीष सावंत ,साईजित शिवलकर,निशिता शिवलकर, पांडुरंग केळकर, मोहन पटवर्धन, सुरेखा लिमये, अमित काटे यासारख्या शेकडो गोभक्तांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला .
त्यानंतर भूमिपूजन व गायत्री मंत्राचा जप झाला. सदर गायत्री मंत्राच्या जपासाठी अनेक कुटुंबीय गायत्री मंत्राचा जप करत या यज्ञामध्ये सहभागी झाली होती.ढोल ताशाच्या गजरामध्ये पुण्यातील कार्यकर्त्यांचे स्वागत व अतिथींचे स्वागत करण्यात आले.स्वागतानंतर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गटांचे स्वागत व त्यांच्या हस्ते गुणवान विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण झाले .गोमातेसाठी अनेकांनी विविध प्रकारचे कार्य करण्याचा संकल्प केला. जमिन मालक श्री शशिकांत सोवनी यांचा सोवनी कुटुंबीयांचे प्रतिनिधी म्हणून सोमेश्वर शांतीपिठाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.राजेश आयरे यांनी सोमेश्वर शांती मिठामार्फत विविध प्रकारचे जे उपक्रम पुढील कालखंडामध्ये योजले जाणार आहेत त्याविषयी माहिती दिली.यामध्ये योगाश्रम, निसर्गोपचार केंद्र,वनौषधी लागवड,आंनदाश्रम या विविध उपक्रमांची माहिती दिली.भूमिपूजन कार्यक्रमाची सांगता स्वरा व मृण्मयी आयरे यांनी गोभक्तीवर आधारित गीत गायनाने केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button