मुंबई-गोवा महामार्ग आज अवजड वाहतुकीसाठी बंद


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ५ जानेवारीला रायगड जिल्ह्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रम लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक शुक्रवारी बंद ठेवली जाणार असल्याची अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जारी केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे १ लाख लाभार्थी सहभागी होणार आहेत. त्यांच्या वाहतुकीसाठी २ हजार बसेस व शेकडो चारचाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी उसळून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक ५ जानेवारीला सकाळी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तर खोपोली-पाली ते वाकण मार्गावरील अवजड वाहतूक सकाळी ८ ते सकाळी सकाळी १२ तर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीसाठी बंद ठेवली जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button