पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू


पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी कोथरुडमध्ये गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शरद मोहोळ याच्यावर कोथरुड येथील सुतारदरा भागात दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराकडून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेनंतर पुणे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button