ठार मारण्याची धमकी, सावकाराविरूद्ध गुन्हा


व्याजी दिलेल्या ३८ हजार रुपयांचे आता २ लाख रुपये झाले आहेत. हे पैसे दे अन्यथा तुझ्यासह वडिलांनाही ठार मारून टाकेन, अशी धमकी देणार्‍या सावकाराविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पैशासाठी पिळवणूक करणार्‍या आणखी एका सावकाराचा प्रताप समोर आला आहे. ३८ हजार रुपये कर्जाच्या बदल्यात २ लाख रुपयांची मागणी हा सावकार करत होता, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
सर्वेज पाटील (रा. मिरजोळे, पाटीलवाडी)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध सुजन सुरेश सागवेकर यांनी तक्रार दाखल केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजन सागवेकर यांनी मार्च २०२३ मध्ये आईची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी सर्वेश पाटील याच्याकडून मोटारसायकल गॅरंटी ठेवून ३८ हजार रुपये १० टक्के प्रतिमहिना व्याजाने घेतले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button