
गांजुर्डा येथे रिक्षाच्या समोर कुत्रा आडवा आल्याने रिक्षाचा अपघात; चालकासह तिघे जखमी
रत्नागिरी शहरातील शिरगांव-गांजुर्डा येथे घरातील नातेवाईकांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात झाला. या अपघातात चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले तर एक प्रौढ गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी बाराच्या सुमारास शिरगाव रस्त्यावरील गांजुर्डा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक नदीम शौकत फणसोपकर (वय ४०) हा रिक्षा (क्र. एमएच-०८ बीसी ०७७३) घेऊन रत्नागिरी ते शिरगाव असा जात असताना गांजुर्डा रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याचा रिक्षा वरिल ताबा सुटला व रिक्षा गांजुर्डा येथील गडग्यावर जाऊन आदळली. या अपघातात चालकासह दहा वर्षाचा मुलगा हार्दिक नरेश माची, हेमलता नरेश माची, शायदा आसिफ शेगले यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र कासम अन्वर शेगले (वय ४०, रा. साखरतर, रत्नागिरी) यांनी गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्तांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी कासम शेगले यांनी अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com