कमी वयाच्या मेट्रोचालक आदिती सरवणकरांचा टाळसुरे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार सत्कार
राजापूर तालुक्यातील आडवलीची कन्या आदिती सरवणकर या मुंबई येथे मेट्रो चालवणाऱ्या सर्वात कमी वयाच्या मेट्रोचालक ठरल्या आहेत.या यशाबद्दल टाळसुरे-नारगोली ग्रुपग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच पूर्वा सकपाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सरवणकर या माहेरच्या आदिती पड्यार यांनी यशाचे श्रेय आई-वडिलांसह व पती स्वप्नील सरवणकर यांना दिले आहे.
त्या म्हणाल्या, सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत मजल मारली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले. मुलींनाही प्रत्येक क्षेत्रात मुलांप्रमाणेच करियर करण्याची संधी आहे. ती ओळखून कठोर मेहनत केली पाहिजे. सातत्य ठेवले तर यश नक्की संपादन करू शकतो. यशाला कोणताच शॉर्टकट नसतो तर या प्रसंगी सरपंच पूर्वा सकपाळ म्हणाल्या, आदिती यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मुलामुलींनी विविध क्षेत्रात करिअर करून आई-वडिलांचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे.
www.konkantoday.com