गुगल पे आणि पेटीएमशी स्पर्धा करण्यासाठी आता बाजारात येणार टाटा पे,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने टाटा समूहाच्या डिजिटल पेमेंट अॅप टाटा पेमेंट्सला पेमेंट एग्रीगेटर (PA) परवाना मंजूर केला आहे, ज्यामुळे कंपनीला त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे ईकॉमर्स व्यवहार सुलभ करण्यात मदत होणार आहे. टाटा पेमेंट हे समूहाच्या उपकंपनी टाटा डिजिटलद्वारे चालवले जाणार असून, जे त्यांचे डिजिटल व्यवसाय सांभाळते.
टाटा पे बहुप्रतीक्षित पेमेंट परवाना सुरक्षित करण्यासाठी Razorpay, Cashfree, Google Pay आणि इतर कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “पेमेंट एग्रीगेटर लायसन्समुळे आता टाटा त्यांच्या उपकंपन्यांमधील सर्व ईकॉमर्स व्यवहारांना सक्षम बनवू शकतो, ज्यामुळे निधीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत होणार आहे.”
Tata Pay बरोबर बंगळुरू आधारित ओळख पडताळणी स्टार्टअप डिजिओनेही १ जानेवारीला PA परवाना देखील मिळवला, ज्याला गुंतवणूक प्लॅटफॉर्म Groww ने पाठिंबा दिला आहे. डिजिओ अनेक फिनटेकसाठी डिजिटल ओळख करून देण्याचे माध्यम असून,पेमेंट सेवा प्रदान करण्यास सक्षम असणार आहे.
www.konkantoday.com