महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यातर्फे रत्नागिरी येथे कौमी एकता सप्ताह उत्साहात साजरा
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी कौमी एकता सप्ताह निमित्त सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह. भ. प उल्हास लाड बुवा किर्तनकार,व श्रीनिवास नाटेकर बुवा किर्तनकार, महेश यादव सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा विलणकर महिला भजन अध्यक्षा यांच्या हस्ते दिपपुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रत्येकाने आपापल्या कलागुणांना दाद देत आनंदी वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लाड बुवा यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळक यांनी का साजरा केला याचा ही आवर्जून उल्लेख केला. प्रेरणा विलणकर.निधी सावंत, रुतुजा , सिमा मॅडम, अनुष्का पवार यांनीविविध गाण्याचे बोल सादर केले . तसेच राणी बावणे या चिमुकली ने ही मन लागोरे लागोरे व हरि ॐ दत्त दिगंबर म्हणा ही गाणी सादर केली.
कार्यक्रमास सुरेंद्र घुडे, सुरेश लिमये, जेष्ठ नागरिक रमाकांत पांचाळ यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री नाटेकर बुवा व लाड बुवा यांनी सांस्कृतिक दिवस व कार्तिक एकादशी निमित्ताने सर्वाना एकञित करून विठ्ठलाचा गजर करीत प्रसन्न वातावरणात कार्यक्रम सांगता केली.
संस्कृती शिंदे केंद्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले. पुजा, जान्हवी नागवेकर यांनी सहकार्य केले.
www.konkantoday.com