पिक्चर अभी बाकी है, संजय राऊतांकडून मकाऊतील 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर, बावनकुळेंच्या अडचणी वाढणार?
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे.
राऊतांनी मकाऊतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राऊतांनी 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परदेशात कसिनो खेळत असल्याचा आरोप याआधीच संजय राऊतांनी केला होता. त्याबाबतचा कथित फोटो राऊतांनी शेअर केला होता. त्यावरुन उठलेली आरोपांची राळ खाली बसण्यापूर्वीच राऊतांनी आता व्हिडीओची झलक शेअर केली आहे.
नव्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
संजय राऊत यांनी आज मकाऊतील नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका कसिनोसदृश्य ठिकाण दिसत आहे. एक व्यक्ती कॅमेरा घेऊन चालत आहे.आजूबाजूला अनेक लोक टेबल खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेच संजय राऊतांनी या सहा सेकंदाच्या व्हिडीओला पिक्चर अभी बाकी है, असं कॅप्शन दिलं आहे.
www.konkantoday.com